Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
Search Tag:     From Date:     To Date:     Section:    
Total Results: 86
शेतकर्‍याची पुण्यात आत्महत्या 5पाटण, दि. 13 : तालुक्यातील वनकुसवडे पठारावरील शेतकरी  शिवाजी गुणाजी पवार (वय-55), रा. काठी, ता. पाटण या शेतकर्‍याने आपल्या मुलाचा कडकनाथ कोंबडी व्यवसाय धोक्यात आल्याच्या कारणावरून पुणे येथे मुलाच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.   मुलगा जालिंदर शिवाजी पवार याने भागीदारीत सुमारे 8 लाख रुपयांचे कर्ज  काढून चार महिन्यापूर्वी काठी येथे महारयत अ‍ॅग्रो कंपनी कडून कडकनाथ कोंबडी पालन व्यवसाय सुरू केला होता. चार महिन्यातच महारयत अ‍ॅग्रो कंपनीच्या संचालकांनी कंपनीत कोट्यवधी रुपयांचा घोटाळा करून पोबारा केल्याने गुंतवणूक केलेले शेतकरी गोत्यात आले. हा धक्का सहन न झाल्याने शेतकरी शिवाजी गुणाजी पवार यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. या आत्महत्येची तक्रार जालिंदर शिवाजी पवार याने कोथरूड (पुणे) पोलीस ठाण्यात दिली. दरम्यान, कडकनाथ प्रकरणी पाटण तालुक्यात दुसरा बळी गेल्याने राज्यात एकच खळबळ माजली आहे. याबाबत अधिक माहिती अशी, शिवाजी गुणाजी पवार (वय- 55  रा. काठी, ता. पाटण) हे सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील होते.
Saturday, September 14, 2019 AT 08:46 PM (IST)
मूळगाव व नेरळे पूल वाहतुकीसाठी खुले 5पाटण, दि. 10 : कोयना धरण परिसरात पावसाचा जोर मंदावला असून धरणात येणार्‍या पाण्याचे प्रमाणही मोठ्या प्रमाणावर घटल्याने धरणाच्या सहा वक्री दरवाजातून विनावापर सोडण्यात येणारे पाणी मंगळवारी बंद करण्यात आले. सध्या केवळ पायथा वीजगृहातून वीजनिर्मिती करून प्रतिसेकंद 2 हजार 100 क्युसेक्स पाणी पूर्वेकडे कोयना नदीपात्रात सोडण्यात येत आहे. यामुळे कोयना नदीच्या पाणीपातळीत घट होवून विस्कळीत झालेले जनजीवन आता पूर्वपदावर आले आहे.    दरम्यान, अनंत चतुर्दशीच्या पार्श्‍वभूमीवर हे पाणी बंद करण्यात आल्याने या दिवशी विसर्जित होणारे घरगुती व गणेश मंडळांच्या मूर्तींचे पाण्यात विसर्जन करण्यासाठीच्या नैसर्गिक अडचणी दूर झाल्या आहेत. यामुळे गणेशभक्त, मंडळांचे कार्यकर्ते व सभासद यांच्यात समाधान व्यक्त होत आहे. परिणामी प्रशासनासह पोलीस यंत्रणाचाही ताण कमी झाला आहे. तर मूळगाव व नेरळे पुलावरील पाणी ओसरून दोन्ही पूल वाहतुकीसाठी खुले झाले आहेत. कोयना धरणांतर्गत विभागात पावसाचा जोर मोठ्या प्रमाणावर मंदावल्याने धरणात येणार्‍या पाण्याचे प्रमाण त्याच पटीत घटले.
Wednesday, September 11, 2019 AT 08:31 PM (IST)
5वाई, दि. 9 ः इस्लामपूर येथील महारयत अ‍ॅग्रो इंडिया प्रा. लि. या कंपनीने कडकनाथ कोंबडी पालन प्रकरणी वाई व जावली तालुक्यातील शेतकर्‍यांची 44 लाख 57 हजार रुपयांची फसवणूक केली आहे. या प्रकरणी वाई तालुक्यातील शेतकर्‍यांनी पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला असून कंपनीचे संस्थापक अध्यक्ष सुधीर शंकर मोहिते व सहसंचालक संदीप सुभाष मोहिते यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी, वाई तालुक्यातील मोतीबाग वाई येथील सुनील नायकवडी यांनी 4 लाख 50 हजार, विलास नायकवडी (शहाबाग) यांनी 2 लाख, रुपक शेवते (शहाबाग) 7 लाख 20 हजार, अमित ननावरे (बावधन) यांनी 2 लाख 3 हजार, मयूर ननावरे (मोतीबाग) यांनी 60 हजार, अमोल जमदाडे (शांतीनगर) यांनी 1 लाख, संदेश जमदाडे (शांतीनगर) यांनी 1 लाख 33 हजार, अरुण गायकवाड (ओझर्डे) यांनी 1 लाख 20 हजार, जय ननावरे (कवठे) यांनी 1 लाख असे एकूण 20 लाख 86 हजार रुपये वेळोवेळी कडकनाथ कोंबडी पालनासाठी महारयत अ‍ॅग्रो इंडियामध्ये भरले होते.
Tuesday, September 10, 2019 AT 08:42 PM (IST)
5कोल्हापूर, दि. 6 (प्रतिनिधी) : ज्येष्ठ पुरोगामी नेते कॉ. गोविंद पानसरे खून खटल्यातील आणखी तीन मारेकर्‍यांना आज पहाटे मुंबई, पुणे येथून अटक करण्यात आली. यात डॉ. नरेंद्र दाभोळकर हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेला सचिन अंदुरे या शार्प शूटरचा समावेश आहे. अंदुरे याला पुणे येथील जेलमधून तर अमित बद्दी आणि गणेश मिस्किन याला मुंबई येथील आर्थर रोड जेलमधून ताब्यात घेण्यात आले. आज सकाळी अकरा वाजता तिन्ही मारेकर्‍यांना कोल्हापूर येथील न्यायालयात हजर करण्यात येत आहे. अंदुरे, बद्दी व मिस्कीन यांना ताब्यात घेतल्यामुळे आतापर्यंत अटक झालेल्या आरोपीची संख्या बारा झाली आहे. कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणी एसआयटीने याआधी संशयित शरद कळसकर याला अटक केली आहे.
Saturday, September 07, 2019 AT 08:35 PM (IST)
कोयना धरणाचे दरवाजे दहा फुटांनी उचलले पुन्हा एकदा महापुराची शक्यता? 1 लाख 3248 आवक : 79 हजार 4 क्युसेक्स विसर्ग 104.92 टीएमसी पाणीसाठा : नदीकाठच्या गावांना इशारा 5पाटण, दि. 4 : कोयना धरण पाणलोट परिसरात पुन्हा दमदार पावसाने एन्ट्री केल्याने शिवाजीसागर जलाशयात तब्बल 1 लाख 3248 क्युसेक्स प्रतिसेकंद पाण्याची आवक सुरू आहे. 105.25 टीएमसी पाणीसाठा क्षमता असलेल्या धरणात आजच्या घडीला 104.92 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे धरणातील पाणी साठवण क्षमता संपुष्टात आल्याने ज्या पटीत पाण्याची आवक होईल त्याच पटीत ते पाणी पूर्वेकडे सोडण्याशिवाय व्यवस्थापनाला पर्यायच उरलेला नाही. त्यामुळे धरणाचे सहा वक्र दरवाजे बुधवारी सकाळी 11 वाजता 10 फुटांनी वर उचलून त्यातून 70 हजार 298 व पायथा वीजगृहातून वीजनिर्मिती करून 2 हजार 100 असे एकूण प्रतिसेकंद 79 हजार 4 क्युसेक्स पाणी कोयना नदीपात्रात सोडण्यात आले आहे. दरम्यान, सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे पुन्हा एकदा कोयना नदीच्या पाणीपातळीत मोठ्या प्रमाणात वाढ होवून अनेक ठिकाणी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे.
Thursday, September 05, 2019 AT 08:29 PM (IST)
1 2 3 4 5 ...
 
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: