Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
Search Tag:     From Date:     To Date:     Section:    
Total Results: 44
5मायणी, दि.22 : येथील आबासाहेब जगन्नाथ माने यांचा चिरंजीव जयेश (वय 14) याचा मामाच्या गावात विहिरीत बुडून मृत्यू झाला. याबाबत अधिक माहिती अशी, की जयेशच्या  शाळेला सुट्ट्या लागल्याने तो नेवरी, ता.खानापूर येथे मामाच्या गावी यात्रेसाठी गेला होता. मंगळवार, दि. 21 रोजी आपल्या नातेमंडळातील काही मुले व गावातील मुलांबरोबर तो पोहण्यासाठी तिथेच जवळ असणार्‍या विहिरीवर गेला होता. त्याला पोहता येत नव्हते.    त्यामुळे तो विहिरीच्या काठावर बसला होता. बाकीची मुले पोहण्याचा आनंद घेत होते. पण थोड्याच वेळात त्यातील काही मुलांना जाणवले, की जयेश ठिकाणी नाही. त्याला पोहता येत नसल्यामुळे पाण्यात उतरणे शक्य नव्हते. त्यामुळे त्यांनी इतरत्र शोधाशोध केली. परंतु तो मिळून न आल्यामुळे चुकून त्याने विहिरीत उडी मारली का असा विचार करून मुलांनी शोधाशोध केल्यानंतर विहिरीत त्याचा मृतदेह आढळून आला. जयेश हा नुकताच नववीत गेला होता. तो भारत माता विद्यालयाचा अतिशय हुशार व मनमिळावू स्वभावाचा विद्यार्थी होता. आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेतही त्याने उत्तुंग यश मिळवले होते.
Thursday, May 23, 2019 AT 08:47 PM (IST)
5पाटण, दि. 21 : पाटणपासून एक ते दीड किलोमीटर अंतरावर कोयना नदीवरील नेरळे पुलाजवळ 22 वर्षीय युवकाचा पाण्यामध्ये बुडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. विजय विलास संकपाळ असे मृत युवकाचे नाव आहे. या युवकाला पाण्यात बुडत असताना अनेकांनी वाचवण्याचे प्रयत्न केले. परंतु पाण्याचा वेग व प्रवाह मोठा असल्याने त्यांना अपयश आले. या घटनेची फिर्याद त्याचे चुलते लक्ष्मण यशवंत सपकाळ यांनी पाटण पोलिसात दिली आहे. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. या बाबत घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी, विजय विलास संकपाळ (वय 22, रा. झाकडे, किल्ले मोरगिरी, ता. पाटण) सध्या रा. मुंबई हा युवक आपल्या मूळगावी सुट्टीसाठी आला होता. मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास चुलते व मित्रांसोबत कपडे धुण्यासाठी व पोहण्यासाठी तो कोयना नदीवर गेला होता. नदी पात्रामध्ये पोहताना पाण्याचा अंदाज न आल्याने तो नेरळे पुलानजीक असलेल्या पाटणला पाणी पुरवठा करणारे जलकेंद्राजवळील पाण्याच्या डोहामध्ये गेला व तो पाण्यामध्ये बुडू लागला.
Wednesday, May 22, 2019 AT 08:45 PM (IST)
आई व मुलाच्या पवित्र नात्याला कलंक लावणारी घटना 5भुईंज, दि. 17 : काळंगवाडी, ता. वाई येथे गुरूवारी रात्री मुलानेच आईवर बलात्कार केल्याची घटना घडली. यामध्ये वडिलांनी हस्तक्षेप केल्यानंतर त्यांनाच दगडाने मारहाण करून जखमी केले. या घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून भुईंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या घटनेने आई आणि मुलाच्या पवित्र नात्याला काळीमा फासला गेल्याने संतापाची लाट उसळली आहे. याबाबत भुईंज पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, की पीडित महिला पतीसमवेत एका लग्न समारंभास गेली होती. लग्न समारंभ झाल्यानंतर पीडिता एकट्याच घरी आल्या. यावेळी त्यांचा 28 वर्षांचा मुलगा घराच्या ओठ्यावर बसला होता. आई घरात गेल्यावर मुलगा घरात गेला व त्याने आतून कडी लावली. यावेळी त्याने जबरदस्तीने आईवर बलात्कार केला. आईने आरडाओरडा सुरू केल्याने परिसरातील शेजारी तेथे जमा झाले. त्यांनी संशयित मुलाच्या वडिलांना याची माहिती दिली. त्याच्या वडिलाने यामध्ये हस्तक्षेप केला असता त्याने वडिलांनाही दगड मारून जखमी केले. घटनेनंतर पीडित महिलेने भुईंज पोलीस ठाण्यात धाव घेतली. घटनेची माहिती ऐकून पोलीसही हादरून गेले.
Saturday, May 18, 2019 AT 08:57 PM (IST)
5कराड, दि. 12 ः मालखेड, ता. कराड गावच्या हद्दीत सम्राट लॉजच्या समोर मोकळ्या जागेत मांडुळाची तस्करी करणार्‍या दोघांना कराड तालुका पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेतले. ही कारवाई रविवारी सायंकाळी पाचच्या सुमारास केली. त्यांच्याकडून सुमारे तीस लाख रूपये किमतीचे एक रेड सॅण्डबो जातीचे मांडूळ व एक दुचाकी असा सुमारे तीस लाख तीस हजारांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे. पांडुरंग भगवान शिंदे (वय 34), जयवंत शंकर ताटे (वय 33, दोघेही रा. कासेगाव, ता. वाळवा, जि. सांगली) अशी मांडूळ तस्करी प्रकरणी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मालखेड, ता. कराड गावच्या हद्दीत सम्राट लॉजच्या परिसरात दोघे जण मांडूळ सापाची तस्करी करणार असल्याची बातमी पोलिसांना समजली. बातमीदाराच्या माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक अशोक भापकर व हवालदार म्हेत्रे यांनी मालखेड येथील सम्राट लॉज परिसरात सापळा रचला. सायंकाळी पाचच्या सुमारास पांडुरंग शिंदे व जयवंत ताटे हे डिस्कवर गाडीवरून तेथे आले. त्यांच्या गाडीला एक पिशवी अडकवलेली होती.
Monday, May 13, 2019 AT 09:09 PM (IST)
5कराड, दि. 9 : आयपीएलमधील सामन्यावर सट्टा घेण्यासाठी येथील नगरपालिका परिसरात फिरत असलेल्या अभिजित आनंदा शेंद्रे (वय 24, रा. गुरुवार पेठ, कराड) यास पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेतले. त्याच्याकडून 54 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, आयपीएल क्रिकेट मॅचवर शहरात सट्ट सुरू असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी नवनाथ ढवळे यांना मिळाली. त्यानुसार, त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सापळा रचून नगरपालिका परिसरात सट्टा घेण्यासाठी फिरत असलेल्या अभिजित शेंद्रे यास ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे रोख 32 हजार रुपये व सट्ट्यासाठी लागणारे साहित्य सापडले. पोलीस उपनिरीक्षक सदाशिव शेलार, कर्मचारी प्रवीण पवार, चंद्रकांत पाटील, सौरभ कांबळे, संतोष चव्हाण यांनी ही कारवाई केली.
Friday, May 10, 2019 AT 08:42 PM (IST)
1 2 3 4 5 ...
 
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: