Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
Search Tag:     From Date:     To Date:     Section:    
Total Results: 54
5कराड, दि. 22 : हद्दपार केलेला संशयित पुन्हा कराड शहरात आढळून आल्याने पोलिसांनी त्याला अटक केली. मंगळवारी दुपारी 1 च्या सुमारास ही कारवाई करण्यात आली आहे. अनिल रवींद्र वारे (वय 24, रा. बुधवार पेठ, कराड) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले, की अनिल वारे याला      जिल्हा पोलीस प्रमुखांच्या आदेशानुसार कराडसह सातारा, खटाव, पाटण, माण, कोरेगाव तसेच सांगली जिल्ह्यातील कडेगाव, वाळवा व शिराळा तालुक्यातून एक वर्षासाठी हद्दपार केले होते. मात्र, तो जिल्हा पोलीस प्रमुखांच्या आदेशाचा भंग करून कराड शहरात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार शहर पोलीस ठाण्यातील गुन्हे अन्वेषण विभागाचे सहाय्यक पोलीस  निरीक्षक हनुमंत गायकवाड यांनी कराड बसस्थानकाजवळील नवग्रह मंदिराशेजारी त्याला ताब्यात घेतले. या कारवाई वेळी हवालदार विनोद माने यांच्यासह गुन्हे शाखेचे पोलीस कर्मचारी उपस्थित होते. बुधवार, दि. 23 रोजी अजित वारे याला न्यायालयात हजर केले जाणार असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड यांनी सांगितले.
Wednesday, May 23, 2018 AT 09:22 PM (IST)
5वरकुटे-मलवडी, दि. 21 : माण तालुक्यातील बनगरवाडी, वरकुटे-मलवडी, महाबळेश्‍वरवाडी परिसरात वादळी वार्‍यासह झालेल्या पावसाने बनगरवाडी येथील शेतकर्‍यांचे पॅक हाऊस उडून गेल्याने सुमारे सहा लाखांचे नुकसान झाले आहे. वादळी वारा त्यातच  गारांचा मारा झाल्याने द्राक्षे, डाळिंब, भाजीपाला यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. बनगरवाडी येथील शेतकरी भारत भानदास अनुसे यांनी 2017 मध्ये गट नं.345 मध्ये बांधलेल्या पॅक हाऊसवरील पत्र्याचे पूर्ण छत उडाले. याच इमारतीत असलेल्या शेतीउपयुक्त रासायनिक खतांची 80 पोती, धान्य भिजल्याने सुमारे तीन लाख रूपयांचे नुकसान झाले आहे. तसेच वैशाली अजित शिंगाडे यांच्या गट नं. 337 मधील पॅक हाऊसवरील पत्र्याचे छत उडून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सुदैवाने जीवित हानी टळली. दगडू बगाडे यांच्या घरावरील पत्रा अँगलसह निखळला. वरकुटे-मलवडी येथील किसन आटपाडकर यांच्या चार खणाच्या घरावरील लोखंडी अँगलसह पत्रा 500 फूट अंतरावर उडून गेला. वादळी वार्‍यामुळे अनेक वृक्ष उन्मळून पडले तर पाडाला आलेल्या आंब्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. वादळी वार्‍यामुळेे 24 तास वीजपुरवठा खंडित होता.
Tuesday, May 22, 2018 AT 09:03 PM (IST)
5कराड, दि. 18 : कराड तालुक्यातील तांबवे गावामध्ये रात्री व सकाळी पिसाळलेल्या कुत्र्याने नागरिकांवर हल्ला करत सुमारे पंधरा ते वीस जणांना चावा घेतल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकाराने गावामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जखमी झालेल्या रुग्णांना कराड येथील स्व. सौ. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात व सुपने प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. गुरुवारी रात्री पिसाळलेल्या कुत्र्याने शेतातून गावामध्ये दिसेल त्याला काही कळण्याअगोदरच चावा घेतला. सुमारे पंधरा ते वीस जणांना कुत्र्याने चावा घेतला. दरम्यान, सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी उपजिल्हा रुग्णालयात जाऊन रुग्णांची भेट घेतली व झालेल्या हल्ल्याबाबत माहिती घेऊन उपचाराबाबत डॉक्टरांना सूचना केल्या. तसेच पशुधन अधिकारी डॉ. कदम यांना तांबवे गावातील इतर जनावरे व कुत्रे यांचेवर योग्य ती प्रतिबंधात्मक उपाययोजना करणेच्या सूचना दिल्या. यावेळी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रकाश शिंदे, गटविकास अधिकारी अविनाश फडतरे, उपअभियंता महेश आरळेकर, विस्तार अधिकारी अरविंद माने उपस्थित होते.
Saturday, May 19, 2018 AT 08:48 PM (IST)
5कराड, दि. 16 : मोटार-सायकलवरून आईस्क्रीम विक्री करण्यासाठी गेलेल्या हणमंत जगन्नाथ जाधव (वय 45, रा. साकुर्डी, ता. कराड) यांचा टेम्पोच्या धडकेत जागीच मृत्यू झाला. याबाबत तालुका पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, बुधवारी दुपारी डेळेवाडी (ता. कराड)  गावच्या हद्दीत हणमंत जाधव हे मोटारसायकलवरुन आईस्क्रीम विकायला गेले होते. त्यावेळी मागून भरधाव वेगाने आलेल्या छोटा हत्ती टेंपोने (एमएच-11-एजी-5179) जोरदार धडक दिली. यामध्ये जाधव हे गंभीर जखमी झाले. त्यांना कराड येथील वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. मात्र, उपचार सुरू होण्यापूर्वीच ते मृत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. याबाबत कराड तालुका पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
Thursday, May 17, 2018 AT 08:42 PM (IST)
जावली तालुक्यातील सरताळे येथील घटना, महावितरणचा महाभोंगळ कारभार चव्हाट्यावर 5कुडाळ, दि. 14 : सरताळे (काळेवाडी), ता. जावली येथे शेती पंपासाठी अनधिकृत वीज जोडणी देताना अचानक वीजप्रवाह सुरू झाल्याने विजेचा धक्का बसून हणमंत गंगाराम पोतेकर (वय 40,  रा. शेंद्रे)  या खाजगी कामगाराचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे महावितरणचा जावली तालुक्यातील भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. या प्रकरणी महावितरणचे दोषी अधिकारी, संबंधित ठेकेदार व कर्मचार्‍यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी सरताळे ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे.   या घटनेची खबर शरद मोहिते यांनी कुडाळ पोलीस दूरक्षेत्रात दिली आहे. याबाबत रात्री उशिरापर्यंत कोणावरही गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. वीज जोडणीसाठी खाजगी ठेकेदारांना काम देऊन अधिकृत वीज कर्मचारी सर्वसामान्य जनतेची आर्थिक पिळवणूक करून फक्त मलिदा खाण्यासाठीच आहेत का, असा संतप्त  सवाल यावेळी उपस्थितांनी केला.
Tuesday, May 15, 2018 AT 08:35 PM (IST)
1 2 3 4 5 ...
 
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: