Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
Search Tag:     From Date:     To Date:     Section:    
Total Results: 22
5कराड, दि. 20 : विहे, ता. पाटण येथील प्रथमेश संकपाळ या महाविद्यालयीन विद्यार्थ्याच्या पार्ले गावच्या हद्दीत झालेल्या खून प्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या दोन संशयितांना दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकार्‍यांनी दिला आहे. दरम्यान, संशयितांनी वापरलेल्या दोन मोटरसायकली पोलिसांनी सोमवारी जप्त केल्या आहेत. चिन्मय जगताप (वडगाव हवेली), विजय माने (रेल्वे स्टेशन, शिरवडे) व अन्य दोघांनी प्रथमेश संकपाळचा तीन दिवसांपूर्वी खून केला होता. यापैकी चिन्मय जगताप व विजय माने यांना रविवारी अटक करण्यात आली. अन्य दोन संशयित अल्पवयीन आहेत. जगताप व माने यांना सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले. जप्त करण्यात आलेल्या मोटरसायकली संशयितांच्या मित्रांच्या असल्याचे पोलीस निरीक्षक अशोक क्षीरसागर यांनी सांगितले.
Tuesday, November 21, 2017 AT 08:47 PM (IST)
5पाटण, दि. 17 :येरफळे व अडूळ गावच्या हद्दीवरील सोनारखडी शिवारात शॉर्ट सर्किटने अचानक लागलेल्या आगीत 17 शेतकर्‍यांचा 10 एकर ऊस जळून खाक झाला आहे. शुक्रवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. दोन्ही गावातील युवकांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. त्यास यश आले नाही. वीज वितरण कंपनी व महसूल विभागाने या घटनेचा पंचनामा केला आहे. दोन्ही गावांच्या शिवेवरील सोनारखडी शिवारात शुक्रवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास विद्युत वाहिनीच्या शॉर्ट सर्किटमुळे उसास आग लागली. त्यामध्ये राजाराम गणपती लुगडे, हणमंत जगन्नाथ पाटील, गोविंदा हरिबा पाटील, बाळासाहेब तुुकाराम पाटील, पंढरीनाथ यशवंत पाटील, शंकर सीताराम लुगडे, पांडुरंग जगन्नाथ पाटील, तानाजी पांडुरंग लुगडे, सुनीता सयाजी पवार, मोहन खाशाबा लुगडे (सर्व राहणार येरफळे), सुमन वसंत शिर्के, प्रवीण मधुकर शिर्के, लक्ष्मीबाई बाबूराव शिर्के, अधिक पांडुरंग शिर्के, आनंदा शंकर शिर्के, शासन हरी केंडे, सुमन नथुराम शिर्के (सर्व राहणार अडूळ) या शेतकर्‍यांचा ऊस आगीच्या भक्ष्यस्थानी पडला आहे.
Saturday, November 18, 2017 AT 08:52 PM (IST)
5वाई, दि. 17 : पिराचीवाडी, ता. वाई येथील अल्पवयीन मुलीस आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी गावातीलच अल्पवयीन मुलास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याबाबत संबंधित मुलीच्या वडिलांनी वाई पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पिराचीवाडी येथील 17 वर्षाच्या मुलीने शुक्रवार, दि. 17 रोजी सकाळी 11 वाजता पूर्वी बोरीचा झरा नावाच्या विहिरीतील पाण्यात उडी घेवून आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. याबाबत तिच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात खबर दिली. गेल्या सहा महिन्यांपासून गावातीलच अल्पवयीन मुलगा आपल्या मुलीच्या पाठीमागे लागून त्रास देत होता. त्याच्या त्रासास कंटाळून तिने आत्महत्या केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार पोलिसांनी संबंधित मुलास ताब्यात घेतले. परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक नंदा पारजे व पोलीस निरीक्षक विनायक वेताळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पी. एस. कदम तपास करीत आहेत.
Saturday, November 18, 2017 AT 08:51 PM (IST)
5रहिमतपूर, दि. 16 :येथील बागवान टेक नाका परिसरातील विहिरीत बुडून साहेबराव बाळा माने (वय 70, रा. रहिमतपूर, ता. कोरेगाव) यांचा मृत्यू झाला. याबाबतची फिर्याद त्यांचा मुलगा सुखदेव माने यांनी रहिमतपूर पोलीस ठाण्यात दिली आहे. याबाबत माहिती अशी, साहेबराव माने हे बाहेरून फिरून येतो, असे सांगून गुरुवारी दुपारी 1 च्या सुमारास घरातून बाहेर पडले. काही तासानंतर त्यांचा मृतदेह बागवान टेक नाका परिसरातील विहिरीत आढळला. लोकांनी याबाबतची माहिती सुखदेव माने यांना दिली. पोलिसांनी अकस्मात मयत म्हणून नोंद केली असून पोलीस नाईक संतोष नाईक तपास करत आहेत.
Friday, November 17, 2017 AT 08:47 PM (IST)
5पाटण, दि. 10 : गुरुवारी पहाटे 5 वाजून 19 मिनिटांनी झालेल्या भूकंपाच्या धक्क्याने कोयना धरण परिसरासह कोकण हादरले. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 3.8 इतकी नोंद झाली आहे. दरम्यान, या भूकंपामुळे कोणतीही जीवित अथवा वित्त हानी झाली नसून कोयना धरणही सुरक्षित असल्याचा निर्वाळा प्रशासनाच्यावतीने देण्यात आला. कोयना धरण परिसरासह सातारा, सांगली आणि रत्नागिरी जिल्हा गुरुवारी पहाटे भूकंपाच्या धक्क्याने हादरला. भूकंपमापन केंद्रावर या भूकंपाच्या धक्क्याची तीव्रता 3.8 रिश्टर स्केल एवढी होती. हा धक्का गुरुवारी पहाटे 5 वाजून 19 मिनिटांनी बसला. भूकंपाच्या धक्क्याची तीव्रता 3.8 रिश्टर स्केल असल्याने नागरिक खडबडून जागे झाले. काहींनी घाबरून घराबाहेर पडणे पसंदकेले. भूकंपाच्या धक्क्याचा केंद्र बिंदूचेअंतर कोयना धरणापासून 21.6 कि.मी.वारणा खोर्‍यात जावळी गावच्या दक्षिणेस 1 किलोमीटर अंतरावर होता.या भूकंपाच्या केंद्रबिंदूची खोली 11 किलोमीटर इतकी नोंद झाली.कोयना धरण सध्या पूर्ण क्षमतेने भरलेअसून धरणात गुरुवारी 102.43टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे.
Saturday, November 11, 2017 AT 09:14 PM (IST)
1 2 3 4 5
 
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: