Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
Search Tag:     From Date:     To Date:     Section:    
Total Results: 11
80 टक्के गळती थांबली पुन्हा प्रयत्न करणार 5महाबळेश्‍वर, दि. 20 : येथील प्रसिद्ध वेण्णा तलावाच्या भिंतीच्या पायातून प्रचंड प्रमाणात होणारी गळती महाबळेश्‍वर पालिकेच्या सुमारे सहा तासांच्या अथक प्रयत्नांनंतर काबूत आली. सुमारे 80 टक्के गळती थांबल्याचे सोमवारी निदर्शनास आले. महाबळेश्‍वर येथील प्रसिद्ध वेण्णा तलावाच्या भिंतीच्या पायातून गेले दोन-तीन महिने मोठ्या प्रमाणात पाणी गळती सुरू होती. त्याबाबत नगरसेवक रवींद्र कुंभारदरे यांनी त्यावर वृत्तपत्रांच्या माध्यमातून प्रकाशझोत टाकल्यावर प्रशासन खडबडून जागे झाले. या तलावातून महाबळेश्‍वर व पाचगणी या पर्यटनस्थळांना पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे दिवसेंदिवस वाढणारी गळती या दोन्ही पर्यटनस्थळांसाठी चिंतेचे कारण झाले होते. ही गळती वेळीच थांबली नाही तर धरणाच्या भिंतीस मोठे भगदाड पडून वेण्णा नदीकाठालगतच्या गावांनाही धोका होणार होता. प्रसारमाध्यमांनी आवाज उठवल्यानंतर आ. मकरंद पाटील व संबंधित खात्याच्या वरिष्ठांनी पाहणी करून उपाययोजना ठरवल्या होत्या. मात्र, त्यास फारशी गती नव्हती.
Tuesday, November 21, 2017 AT 08:49 PM (IST)
संबंधित टोळीवर राज्यभरात 9 गुन्हे सहा जणांना पोलीस कोठडी 5कराड, दि.17: वारुंजी फाटा, ता. कराड येथील सतनाम एजन्सीच्या गोदामातून 32 लाखांच्या सिगारेट मालाची चोरी करून पुण्यातील टोळीने त्याची पुणे येथेच विक्री केल्याचे कराड शहर पोलिसांच्या तपासात स्पष्ट झाले आहे. सिगारेट चोरी हीच या टोळीची खासियत आहे. या टोळीवर राज्यात विविध शहरात सिगारेट चोरीचे नऊ गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, सतनाम एजन्सीतील चोरी प्रकरणी अटक केलेल्या सहा जणांना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने दि.22 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. येथील व्यापारी अनिल बसंतांनी यांच्या मालकीच्या वारूंजी फाटा येथील सतनाम एजन्सीच्या गोदामातून पावणेचार लाखाच्या रोख रक्कमेसह 32 लाखांच्या सिगारेट मालाची दि.13 जुलै रोजी मध्यरात्री चोरी झाली होती. या चोरीप्रकरणी शहर पोलिसांनी पुणे येथील तेजस चंपालाल उनेजा, सुरेश हरिराम चौधरी, मुकेश मोहन चौधरी, सुरेंद्र अस्लारामजी चौधरी, चंपालाल ओघाराम वर्मा, रतनलाल नागाराम डांगे या सहा संशयितांना अटक केली आहे. पोलीस चौकशीत या टोळीने कराडमधील चोरीसाठी पिकअप जीप सोबत आणली होती.
Saturday, November 18, 2017 AT 08:57 PM (IST)
5फलटण, दि.17 : मुलांच्या औषधोपचारासाठी घेतलेले 4 लाख रुपये परत देण्यासाठी गेले असता व्याजासह 13 लाख रुपये झाले आहेत, असे सांगून अपंग दोन भावांची व एका बहिणीची सही घेवून जमीन परस्पर विकून फसवणूक केल्याचा गुन्हा सस्तेवाडी, ता. फलटण येथील एका विरोधात फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये दाखल झाला आहे. याबाबत ग्रामीण पोलीस ठाण्यातून देण्यात आलेल्या माहितीनुसार, विनायक लालासाहेब चव्हाण, रा.सस्तेवाडी, ता. फलटण व इतर 2 अनोळखी व्यक्तींनी हणमंत दत्तात्रय दळवी (रा. वडले, ता. फलटण) यांना एप्रिल 2013 मध्ये 10 टक्के व्याजाने दिलेले 4 लाख रुपये परत देण्यासाठी गेले असता व्याजासह 13 लाख रुपये द्यावे लागतील, असे म्हणत गट नं. 41 मधील जमीन दोन भाऊ व बहिणीची सही घेत भानुदास सस्ते, नंदाबाई सस्ते, विजय सस्ते, दत्तात्रय सस्ते (पूर्ण नावे माहीत नाही.)  सर्व रा.चौधरवाडी, ता.फलटण यांच्या नावावर करून चव्हाण याने 13 लाख रुपये परस्पर घेतले असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. सपोनि. शिंदे तपास करीत आहेत.
Saturday, November 18, 2017 AT 08:55 PM (IST)
5औंध, दि. 16 : वडी, ता. खटाव येथे बुधवारी सायंकाळी एस. टी.ची धडक बसून बायणाबाई बापू मोहिते (वय 80, रा. वडी) यांचा मृत्यू झाला. याबाबत औंध पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी, बुधवारी सायंकाळी सव्वासात वाजता विटा-सातारा ही एस. टी. बस वडी बसस्थानकावर आली. त्या बसमधून बायणाबाई मोहिते या उतरल्या. त्या एस. टी.च्या पुढील बाजूकडून जात असताना त्याच बसची धडक बसून त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना औंध येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. या प्रकरणी एस. टी.चालक वसंत बाबूराव कांबळे (रा. पुसेसावळी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Friday, November 17, 2017 AT 08:49 PM (IST)
5पाटण, दि. 15 : कवडेवाडी, ता. पाटण येथे बौद्धवस्तीत भाऊबंदकीच्या वादातून अर्जुन चोखा गुजर यांच्या कुटुंबाला समाजाने वाळीत (बहिष्कृत) टाकले आहेे. तसेच  तुटपुंजी असलेल्या शेतातील भात व नाचणी पीक भाऊ अंकुश चोखा गुजर याच्या सांगण्यावरून गावगुंडांनी चोरून नेल्याची तक्रार पाटण पोलिसात निवेदनाद्वारे अर्जुन गुजर यांनी केली आहे. अर्जुन गुजर यांनी  निवेदनात म्हटले आहे, कामानिमित्त मी मुंबई येथे असतो. माझी कवडेवाडी येथे 20 गुंठे जमीन आहे. ही जमीन वाट्याने पिंपळोशी येथील एका शेतकर्‍याकडे दिली आहे.    माझ्या शेतातील पीक चोरून नेल्याचे वाटेकर्‍याने मला फोनवरून सांगितल्यानंतर मी तातडीने मुंबईवरून गाव आलो. शेताची पाहणी केली असता माझ्या लक्षात आले. या जमिनीतील कापणीस आलेले पीक माझा भाऊ याच्या सांगण्यावरून गावगुंडांनी चोरून नेले असल्याचा संशय आहे. कवडेवाडी येथील पुढारी लोकांनी भावाच्या सांगण्यावरून माझ्या कुटुंबाला समाजातून वाळीत टाकले आहे. माझ्या कुटुंबाला समजातील कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात घेतले जात नाही. तसेच माझ्या कोणत्याही कार्यक्रमात समाज सहभागी होत नाही.
Thursday, November 16, 2017 AT 08:56 PM (IST)
1 2 3
 
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: