Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
Search Tag:     From Date:     To Date:     Section:    
Total Results: 3
5वाई , दि. 10 : पसरणी, ता. वाई येथील वीज मंडळाच्या ठेकेदाराकडे कामास असलेला शिकाऊ वायरमन अक्षय रामदास कदम (वय 22 रा.ओझर्डे, ता.वाई) हा पसरणी भैरवनाथनगर येथील विजेची तक्रार दूर करण्यासाठी खांबावर काम करत असताना शॉक बसून त्याचा मृत्यू झाला. शुक्रवारी दुपारी 2.15 वाजता ही घटना घडली. विजेची तक्रार दूर करण्यासाठी अक्षय खांबावर चढला होता. त्यावेळी त्याला विजेचा झटका बसला. त्याला तातडीने वाईच्या गितांजली हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आणण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. तीन महिन्यांपूर्वी तो वीज मंडळाच्या ठेकेदाराकडे शिकाऊ कामगार म्हणून रुजू झाला होता. तो आई-वडिलाना एकुलता एक मुलगा होता. त्याच्या मागे आई-वडील व एक बहीण असा परिवार आहे. या घटनेची वाई पोलिसात नोंद झाली आहे.
Saturday, November 11, 2017 AT 09:14 PM (IST)
दोन लाखांसह सहा जण ताब्यात 5उंब्रज, दि. 31 : चोरे, ता. कराड येथे तीन पानी जुगार खेळत असताना उंब्रज पोलिसांनी छापा टाकून सहा जणांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून सुमारे दोन लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.  उंब्रज पोलिसांनी कारवाई गुरुवारी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास ही कारवाई केली. याबाबत उंब्रज पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, चोरे, ता. कराड येथील कुटाळे नावाच्या शेतात झाडाच्या आडोशाला जुगाराचा डाव चालत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. गुरुवारी मिळालेल्या माहितीनुसार उंब्रज पोलिसांनी छापा टाकला. यावेळी श्याम गजानन जंगम वय 27, नरसिंह बाबूराव जगताप वय 62, आप्पासाहेब मानसिंग साळुंखे वय 60, मधुकर तुकाराम भिसे वय 62, प्रकाश ज्ञानू कवळे वय 45, मधुकर भालचंद्र सोनटक्के वय 44, सर्व रा. चोरे, ता. कराड आदी झुगार खेळताना पोलिसांना आढळून आले त्यांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान तीन पानी जुगार खेळत असताना पोलिसांनी अचानक छापा मारल्याने पत्ते खेळणारांची भंबेरी उडाली. यावेळी कारवाईत पोलिसांनी रोख रकमेसह मोबाईल व चार दुचाकी गाड्यासह सुमारे दोन लाखांचा ऐवज ताब्यात घेतला आहे.
Friday, September 01, 2017 AT 09:04 PM (IST)
87.68 टीएमसी पाणीसाठा 5पाटण, दि. 13 : कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाची रिपरिप वाढत असून गेल्या चोवीस तासात जलाशयात 8 हजार 240 क्युसेक्स प्रतिसेकंदने पाण्याची आवक होत आहे. त्यामुळे धरणात पाणीसाठा 87.68 टीएमसी एवढा झाला आहे. कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर नसला तरी पावसाची रिपरिप मात्र सुरू आहे. दरम्यान गतवर्षी याच तारखेला कोयना धरणात तब्बल 95.15 टीएमसी पाणीसाठा शिल्लक होता. तो आजच्या घडीला 7.48 टीएमसीने कमी आहे. गेल्या आठ दिवसापासून पाणलोट क्षेत्रात पावसाने पूर्णपणे उसंत दिल्याने जलाशयातील पाण्याची आवकही मोठ्या प्रमाणात कमी झाली होती. मात्र दोन दिवसांपासून पाणलोट क्षेत्रात पावसाची    रिपरिप सुरू झाली आहे. अधून मधून पावसाच्या हलक्या सरी कोसळू लागल्याने जलाशयातील येणार्‍या पाण्याची आवकही वाढली आहे. त्यामुळे धरणातील पाणीपातळी वाढत आहे.गेल्या चोवीस तासात कोयनानगर येथे 17 (3470), नवजा 16 (3948), महाबळेश्‍वर 8 (3359) मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर जलपातळी 2149 फूट 9 इंच व 655.244 मीटर इतकी झाली आहे. जलाशयात 8 हजार 240 क्युसेक्स पाण्याची आवक होत असून 87.68 टीएमसी पाणीसाठा झाला आहे.
Monday, August 14, 2017 AT 08:52 PM (IST)
 
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: