Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
  भारतीय धार्मिक परंपरेनुसार वर्षातल्या साडे तीन मुहूर्तातला महत्त्वाचा असलेल्या अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर अद्यापही राजस्थान, बिहार, गुजरात, ओरिसा या राज्यात हजारोंच्या संख्येने बालविवाह होतात. कायद्याने बालविवाहाला बंदी आणि असा झालेला विवाह बेकायदा असला, तरीही रूढी परंपरेच्या नावाखाली असे विवाह सर्रास होतात. राजस्थान, बिहारमधल्या ग्रामीण भागात तर सामूहिक बालविवाहांचे सोहळेच साजरे होतात.

Wednesday, April 18, 2018 AT 11:19 AM (IST)

शहरी भागात वाढलेले सिमेंट काँक्रीटचे जंगल, बेसुमार वृक्षतोड, पर्यावरणाचा र्‍हास यामुळे नागरी जीवनाचा अविभाज्य भाग असलेल्या चिमण्यांच्या अधिवास संपत गेला. चिमण्यांना घरटी बांधायला सुरक्षित जागा राहिली नाही. हळूहळू शहरी भागातून बाल जीवनापासून परिचयाची असलेली चिऊताई दिसेनाशी झाली. चिमण्यांची संख्या कमी होत गेली.

Friday, April 13, 2018 AT 11:18 AM (IST)

हिंदीसह मराठी,  मल्ल्याळम, तेलगू,                                                                      तमिळ, भोजपुरी या भाषक  हिंदी चित्रपट सृष्टीतले आणि उपग्रह वाहिन्यांसाठी मनोरंजन मालिकांची निर्मिती करणारे काही निर्माते आणि दिग्दर्शक अभिनेत्रींचे लैंगिक शोषण करीत असल्याचे आरोप यापूर्वी जाहीर ...

Wednesday, April 11, 2018 AT 11:30 AM (IST)

कायदा आणि सुव्यवस्था ठेवायची जबाबदारी असलेल्या पोलिसांवर, तणावाच्या घटनांच्या प्रसंगी उपाशी-तापाशी राहून रस्त्यावर उतरून चोवीस तास बंदोबस्त करावा लागतो. पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या फिर्यादींची नोंद घेऊन त्या गुन्ह्यांचा तपासही करावा लागतो. पोलीस ठाण्याच्या परिसरात गस्तही घालावी लागते. बंद, मोर्चाच्या वेळी तर पोलीसच तणावग्रस्त असतात.

Friday, April 06, 2018 AT 11:14 AM (IST)

भारतीय न्यायालयातील प्रक्रिया अत्यंत विलंबाची असल्याने, देशातल्या सर्व न्यायालयात कोट्यवधी खटले वर्षोनुवर्षे केवळ सुनावणीसाठी रेंगाळत पडले आहेत. खुद्द सर्वोच्च न्यायालयाच्या माजी सरन्यायाधीशांनीही पक्षकाराला उशिरा मिळालेला न्याय हा न्याय नव्हे, न्यायालयीन प्रक्रिया जलद गतीची व्हायला हवी, असे मत जाहीरपणे व्यक्त केले होते.

Wednesday, April 04, 2018 AT 11:23 AM (IST)

केंद्र आणि राज्य सरकारांच्या रोजगाराभिमुख धोरणे आणि निर्णयामुळे देशात दरवर्षी लक्षावधी रोजगारांची निर्मिती होत असल्याचा डांगोरा पिटला जात असला, तरी प्रत्यक्षात मात्र बेकारीचा राक्षस दिवसेंदिवस अधिकच माजल्याचे भीषण सत्य रेल्वेच्या महाभरतीसाठी दाखल झालेल्या कोट्यवधी अर्जांच्यामुळे चव्हाट्यावर आले आहे. रेल्वेने 90 हजार जागांसाठी भरतीची प्रक्रिया सुरू केली. त्यासाठी पहिल्या टप्प्यात सुशिक्षित युवकांच्याकडून अर्ज मागवले गेले आहेत.

Tuesday, April 03, 2018 AT 11:10 AM (IST)

भ्रष्टाचाराच्या विरोधात पहिले आंदोलन अण्णांनी वन विभागातील योजनांविषयी केले. चौदा भ्रष्ट अधिकार्‍यांपैकी चौघांवर निलंबन व अन्य दहांची चौकशी असा निर्णय झाला.  राज्यातील शिवसेना-भाजप युती सरकारमधील भ्रष्ट मंत्र्यांच्या विरोधात अण्णांनी उपोषणाला सुरुवात केली. मंत्र्याविरोधातील आरोप असल्याने लढाई मोठी होती. त्या वेळी जलसंधारणमंत्री महादेव शिवणकर, पाणीपुरवठामंत्री शशिकांत सुतार यांना राजीनामे द्यावे लागले.

Monday, April 02, 2018 AT 11:25 AM (IST)

वटवृक्षाचे झाड आपल्या आश्रयाला आलेल्या सार्‍यांना सावली देते. पण, हे झाड मात्र उन्हा-पावसात, वार्‍या-वादळात ताठपणे उभे असते, याची जाणीव त्या वृक्षाच्या छायेत असलेल्यांना नसते. पण, हा वटवृक्ष जेव्हा कोसळतो, तेव्हा मात्र अथांग आकाश दिसायला लागते आणि आपल्याला मायेची सावली, आधार देणारा हा वटवृक्षच आता जगात राहिला नसल्याच्या जाणिवेने, त्या वटवृक्षाच्या मायेच्या छायेत असलेल्यांना ‘सैरभैर’ या शब्दाचा खरा अर्थ आणि कटू वास्तव कळते. सौ.

Friday, March 30, 2018 AT 10:57 AM (IST)

  सातारा शहराच्या शाहूपुरी परिसरातल्या अंबेदरे रस्त्यात गौरव माने या 20 वर्षाच्या युवकावर भेदरलेल्या बिबट्याने झडप घातल्याच्या घटनेने, शहराच्या परिसरात दहशत निर्माण झाली. गेल्या काही महिन्यात अजिंक्यतारा, कास पठाराच्या भागात समाजकंटकांनी डोंगरात वणवे लावायचा विघ्नसंतोषी उद्योग सुरू केला. या वणव्याने गवत तर जळालेच पण नव्याने लावलेली झाडांची रोपटी, दोन चार वर्षे जगलेली झाडे, पक्ष्यांची घरटीही जळून भस्मसात झाली.

Friday, February 23, 2018 AT 11:19 AM (IST)

  विदर्भ-मराठवाड्यात नुकत्याच झालेल्या गारपिटीच्या तडाख्यात तीन लाख हेक्टर क्षेत्रातील गहू, ज्वारी, संत्री, आंबा, हरभरा, कापूस, अशी पिके जमीनदोस्त झाली. शेतकर्‍यांचे शेकडो कोटी रुपयांचे नुकसान झाले. लिंबाएवढ्या आकाराच्या मोठ्या गारांचा वर्षाव झाल्यामुळे, पोपट, चिमण्या, कावळे, बगळे, असे हजारो पक्षीही गारपिटीने मृत्युमुखी पडले. शेतकर्‍यांनी पाळलेल्या हजारो कोंबड्या गारपिटीच्या मार्‍याने दगावल्या. काही जनावरांचेही मृत्यू झाले.

Wednesday, February 21, 2018 AT 11:16 AM (IST)

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: