Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्यपान  >>  प्रमुख वार्ता

5 जणांचा मृत्यू, 5 बेपत्ता 5अहमदनगर, दि. 13 (प्रतिनिधी) : राज्यभर गणेश विसर्जन शांततेत सुरू असताना विविध ठिकाणी झालेल्या दुर्घटनांमध्ये 10 जण बुडाले आहेत. नगरमध्ये दोघांचा बुडून मृत्यू झाला आहे. अमरावतीत विसर्जनासाठी पाण्यात गेलेल्या एका तरुणाला बुडताना वाचवताना इतर तीन तरुण बुडाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे अमरावतीत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Saturday, September 14, 2019 AT 11:14 AM (IST)

आज दिल्लीत पक्षप्रवेश 5सातारा, दि. 13 : छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज व राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकला आहे. उदयनराजे भोसले हे शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत राजधानी दिल्ली येथे एका जंगी सोहळ्यात भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. खा. उदयनराजे यांनी स्वत: ट्विट करून ही माहिती दिली आहे. महाराष्ट्रात सध्या पक्षांतराची लाट आहे.

Saturday, September 14, 2019 AT 11:10 AM (IST)

5नवी दिल्ली, दि. 11 (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र आणि हरयाणा या दोन्ही राज्यांमधील विधानसभा निवडणुकांच्या तारखा येत्या दोन ते तीन दिवसात जाहीर होण्याची दाट शक्यता आहे. केंद्रीय निवडणूक आयोगातील सूत्रांनी ही माहिती दिली. महाराष्ट्र, हरयाणा व झारखंड या तीन राज्यांत याचवर्षी विधानसभा निवडणुका होत आहेत. प्रथम महाराष्ट्र व हरयाणात तर नंतर झारखंडमध्ये निवडणुका होतील, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

Friday, September 13, 2019 AT 11:17 AM (IST)

5भंडारा, दि. 10 (वृत्तसंस्था) : मध्य प्रदेशातील संजय सरोवराचे पाणी सोडण्यात आल्याने वैनगंगा नदीच्या पाण्याच्या पातळीत प्रचंड वाढ झाली आहे. आज कारधा येथील लहान पुलावरून वैनगंगेचे पाणी वाहत असल्याने या मार्गावरून वाहतूक बंद करण्यात आली. सिहोरा-वाराशिवनी या आंतरराज्य मार्गावरील पुला वरून बावनथडी नदीचे पाणी वाहत असल्याने या मार्गावरील वाहतूकसुद्धा बंद करण्यात आली. भंडारा शहराला लागून असलेल्या ग्रामसेवक कॉलनीतील काही घरांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे.

Wednesday, September 11, 2019 AT 11:00 AM (IST)

गणेश नाईक, कृपाशंकर सिंह, हर्षवर्धन पाटील यांचा प्रवेश ! 5मुंबई, दि. 10 (प्रतिनिधी) : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर भाजपने काँग्रेस-राष्ट्रवादीतील नेत्यांना पक्षात घेण्याचा सपाटा लावला आहे. दि. 11 रोजी महाभरतीच्या तिसर्‍या फेरीत काही बडे नेते भाजपचे कमळ हातात घेणार आहेत.

Wednesday, September 11, 2019 AT 10:57 AM (IST)

पाक परराष्ट्र मंत्र्याची कबुली 5जिनिव्हा, दि. 10 (वृत्तसंस्था) : जम्मू-काश्मीर भारताचाच भाग असल्याची कबुली पाकिस्तानने अखेर दिली. पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरैशी यांनी संयुक्त राष्ट्रासमोर जम्मू-काश्मीरचा मुद्दा उपस्थित करत अनेक आरोप केले. यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी जम्मू-काश्मीर भारताचा भाग असल्याचे सांगितले.

Wednesday, September 11, 2019 AT 10:55 AM (IST)

पुढच्या आठवड्यात आचारसंहिता लागण्याची शक्यता 5मुंबई, दि. 9 (प्रतिनिधी) : कोणत्याही क्षणी विधानसभा निवडणुकांची आचारसंहिता लागू होण्याची शक्यता असल्याने राज्य सरकारने निर्णयांचा धडाका लावला असून आज राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकीत तब्बल 35 निर्णय घेण्यात आले. 28 ऑगस्ट रोजी झालेल्या राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकीत 25 निर्णय घेण्यात आले होते. अनंत चतुर्दशीनंतर कधीही विधानसभा निवडणुका जाहीर होऊन आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे.

Tuesday, September 10, 2019 AT 10:58 AM (IST)

इस्रोकडून संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू 5बेंगळुरू, दि. 9 (वृत्तसंस्था) : चांद्रयान-2 च्या संदर्भात आनंदाची बातमी इस्रोने दिली आहे. या मोहिमेंतर्गत काम करणार्‍या इस्रोच्या एका अधिकार्‍याने माहिती दिली आहे, की विक्रम लँडर नियोजित जागेच्या जवळ उभा आहे. त्याचे नुकसान झालेले नाही. चंद्राच्या पृष्ठभागावर ते थोडे तिरके उभे आहे.

Tuesday, September 10, 2019 AT 10:55 AM (IST)

5मुंबई, दि. 8 (प्रतिनिधी) : महाबळेश्‍वरसह परिसरात मागील चार दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरूच असून या वर्षीच्या हंगामात 300 इंच पाऊस झाला आहे. याबाबत ‘द वेदर चॅनेल इंडिया’ने देखील नुकत्याच केलेल्या ट्विटमध्ये मेघालयातील मॉसिनराम, चेरापुंजीपेक्षा महाबळेश्‍वरात अधिक पाऊस झाल्याचे नमूद केले आहे. या वर्षी येथे आजपर्यंत 7631 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. जगात सर्वाधिक पावसाचे ठिकाण म्हणून मॉसिनराम, चेरापुंजी प्रसिद्ध आहे.

Monday, September 09, 2019 AT 11:32 AM (IST)

5मुंबई, दि. 8 (प्रतिनिधी) : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांची आपल्या उमेदवारांसाठी चाचपणी सुरु आहे. काँग्रेस येत्या 10 सप्टेंबरला आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर करणार असल्याची शक्यता आहे. यामध्ये एकूण 60 उमेदवारांचा समावेश असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काँग्रेसकडून 30 विद्यमान आमदारांना तर गेल्या निवडणुकीत पराभव झालेल्या दिग्गजांनाही संधी मिळणार असल्याचे बोलले जात आहे.

Monday, September 09, 2019 AT 11:14 AM (IST)

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: