Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्यपान  >>  राष्ट्रीय वार्ता

5नवी दिल्ली, दि. 19 (वृत्तसंस्था) : संपूर्ण देशात डिझेलचा दर एकसमान असावा, थर्ड पार्टी इन्शुरन्सच्या प्रीमियममधील जाचक वाढ रद्द व्हावी, आरटीओ, पोलिसांकडून होणारी पिळवणूक थांबावी, टोलमुक्ती आणि अन्य मागण्यांसाठी वाहतूकदारांच्या संघटनांचे राष्ट्रव्यापी ‘चक्का जाम’ आंदोलन उद्या, दि. 20 रोजी सकाळी 6 वाजल्यापासून सुरू होत आहे.

Friday, July 20, 2018 AT 11:00 AM (IST)

5नवी दिल्ली, दि. 18 (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र शासनाच्या ‘बळीराजा जलसंजीवनी’ योजनेंतर्गत दुष्काळग्रस्त व शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांतील जलसिंचन प्रकल्पांसाठी केंद्र शासनाकडून 13 हजार 651 कोटींचा निधी मंजूर झाला असून पुढील वर्षी मे महिन्यापर्यंत या सर्व प्रकल्पांचे काम पूर्ण होणार असल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक व जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांनी आज दिली.

Thursday, July 19, 2018 AT 11:20 AM (IST)

अध्यक्षांनी अविश्‍वास प्रस्ताव स्वीकारला 5नवी दिल्ली, दि. 18 (वृत्तसंस्था) : आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने मोदी सरकारला विरोध दर्शवण्यासाठी विरोधी पक्षांनी लोकसभेत सरकारविरोधात अविश्‍वास प्रस्ताव सादर केला असून हा प्रस्ताव सभागृहात मांडण्यास लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी मंजुरी दिली आहे. या प्रस्तावावर शुक्रवारी (दि. 20) लोकसभेत चर्चा होणार आहे.

Thursday, July 19, 2018 AT 11:17 AM (IST)

कलम अवैध ठरवणेच उपयुक्त : सर्वोच्च न्यायालय 5नवी दिल्ली, दि. 11 (वृत्तसंस्था) : समलैंगिकता फौजदारी गुन्हा ठरवणारे भारतीय दंड विधानातील कलम 377 हे आपल्या देशातील ‘सामाजिक तिरस्कारा’चेच उदाहरण आहे. त्यामुळे हे कलम अवैध ठरवणेच उपयुक्त ठरेल, असे मत सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी व्यक्त केले आहे. न्यायालयाच्या या मतामुळे हे कलम अवैध ठरण्याच्या ‘एलजीबीटी’ समुदायाच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.

Thursday, July 12, 2018 AT 11:41 AM (IST)

केंद्र सरकारची ‘नेट न्यूट्रॅलिटी’ला मंजुरी 5नवी दिल्ली, दि. 11 (वृत्तसंस्था) : ‘नेट न्यूट्रॅलिटी’च्या नियमांना केंद्र सरकारने बुधवारी मंजुरी दिली आहे. त्यामुळे भारतात इंटरनेट वापरणार्‍यांशी कोणताही भेदभाव केला जाणार नाही आणि इंटरनेटचा वापर निर्बंधमुक्त असेल, हे स्पष्ट झाले आहे. यात कोणत्याही प्रकारचा बदल केल्यास वा आदेशाचे  उल्लंघन झाल्यास जबर दंड ठोठावण्याचा इशाराही केंद्राच्या आदेशात देण्यात आला आहे.

Thursday, July 12, 2018 AT 11:25 AM (IST)

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: