Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्यपान  >>  खेळ वार्ता

भारत द. आफ्रिकेकडून 135 धावांनी पराभूत 5सेंच्युरियन, दि. 17 (वृत्तसंस्था) : मायदेशी वाघ असलेल्या टीम इंडियाची विदेशात पुन्हा एकदा ससेहोलपट झाली. सेंच्युरियन येथे आज संपलेल्या दुसर्‍या कसोटीत दक्षिण आफ्रिकेच्या तिखट गोलंदाजीचा सामना करताना भारतीय फलंदाजी पुन्हा एकदा पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. सामन्याच्या पाचव्या दिवशी विजयासाठी 287 धावांचा पाठलाग करताना भारताचा डाव अवघ्या 151 धावांत संपुष्टात आला.

Thursday, January 18, 2018 AT 11:25 AM (IST)

287 धावांचे आव्हान आघाडी फळी गारद 5सेंच्युरियन, दि. 16 (वृत्तसंस्था) : मोहम्मद शमी, जसप्रीत बूमराह व ईशांत शर्मा या त्रिकुटाने दक्षिण आफ्रिकेचा दुसरा डाव 258 धावांवर संपुष्टात आणल्यानंतर दुसर्‍या कसोटीत पाहुण्या भारतीय संघावर पराभवाचे सावट पसरले आहे. विजयासाठी 287 धावांचे आव्हान असताना पहिल्या डावातील शतकवीर विराट कोहलीसह आघाडीचे तीन मोहरे 35 धावांतच गारद झाले आहेत.

Wednesday, January 17, 2018 AT 11:28 AM (IST)

5सेंच्युरियन, दि. 15 (वृत्तसंस्था) : कर्णधार विराट कोहलीचे आपल्या प्रवृत्तीला साजेसे आक्रमक दीडशतक आणि त्याला शेवटच्या फळीतील फलंदाजांनी दिलेली साथ या जोरावर भारताने दुसर्‍या कसोटीच्या पहिल्या डावात कशीबशी 307 धावांपर्यंत मजल मारली. त्यामुळे भारतीय संघ पहिल्या डावात 28 धावांनी पिछाडीवर पडला.

Tuesday, January 16, 2018 AT 11:25 AM (IST)

फिलँडरच्या वादळामुळे आफ्रिका 72 धावांनी विजयी 5केपटाऊन, दि. 8 (वृत्तसंस्था) : गोलंदाजांनी यजमान दक्षिण आफ्रिकेचा दुसरा डाव 130 धावांमध्येच गुंडाळल्यानंतर भारतीय संघ दुसर्‍या डावात चांगली फलंदाजी करुन विजयासाठी असलेले 208 धावांचे लक्ष्य गाठेल, असे वाटत असतानाच भारतीय फलंदाजांनी दुसर्‍या डावातही हाराकिरी केली. व्हरनॉन फिलँडरच्या वादळी गोलंदाजीसमोर भारतीय फलंदाजीच्या ठिकर्‍या उडाल्या.

Tuesday, January 09, 2018 AT 11:34 AM (IST)

भारतालाही झटके विराट कोहलीसह तीन फलंदाज तंबूत 5केपटाऊन, दि. 5 (वृत्तसंस्था) : मायदेशात सलग नऊ कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम करुन दक्षिण आफ्रिकेच्या दौर्‍यावर गेलेल्या भारतीय संघाला हा दौरा किती खडतर आहे, याची कल्पना केपटाऊन कसोटीच्या पहिल्या दिवशीच आली. उसळत्या व वेगवान खेळपट्टीवर भारतीय गोलंदाजांनी यजमान संघाला मोठी धावसंख्या उभारण्यापासून रोखल्यानंतर यजमान गोलंदाजांनी पाहुण्या भारतालाही हादरवले.

Saturday, January 06, 2018 AT 11:41 AM (IST)

5सातारा, दि. 3 :  सातारा तालीम संघाच्या मैदानावर सुरू असलेल्या राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेचा थरार तिसर्‍या दिवशीही सुरूच होता. तिसर्‍या दिवशी झालेल्या फाईटमध्ये सातारा बॉक्सिंग असोसिएशनच्या दोन बॉक्सरनी दिमाखदार फटके लगावत प्रतिस्पर्धी बॉक्सरला आपले तोंड सुद्धा वर काढू दिले नाही. त्यामुळे सातारचा सौरभ राजे आणि करण शिंदे या दोघांनी सेमी फायनलमध्ये धडक मारली.

Thursday, January 04, 2018 AT 11:28 AM (IST)

5कोलकाता, दि. 20 (वृत्तसंस्था) : भारतीय क्रिकेट संघाचे ‘रनमशीन’ अशी बिरुदावली मिरवणार्‍या कर्णधार विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीत शतकांचे ‘अर्धशतक’ पूर्ण करून सोमवारी आणखी एक विक्रम आपल्या नावावर केला. श्रीलंकेविरुद्ध झालेल्या पहिल्या कसोटीत आज कोहलीने कसोटी कारकिर्दीतील 18 वे शतक ठोकले. कोहलीने एकदिवसीय कारकिर्दीत 32 शतके ठोकली असून आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत त्याच्या खात्यावर आता 50 शतके जमा  झाली आहेत.

Tuesday, November 21, 2017 AT 11:01 AM (IST)

5कोलकाता, दि. 16 (वृत्तसंस्था) : भारत आणि श्रीलंका यांच्यात कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर सुरू झालेल्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी पाऊस आणि अंधुक प्रकाशामुळे केवळ 11.5 षटकांचा खेळ होऊ शकला. मात्र, या खेळातही श्रीलंकेने टीम इंडियाची 3 बाद 17 अशी दाणादाण उडवली. मध्यमगती गोलंदाज सुरंगा लकमालने अनुकूल खेळपट्टी आणि ढगाळ हवामानाचा लाभ उठवत तब्बल सहा षटके निर्धाव टाकून तिन्ही बळी घेतले.

Friday, November 17, 2017 AT 11:22 AM (IST)

भारत आजमावणार राखीव फळीचा कस 5कोलंबो, दि. 30 (वृत्तसंस्था) : भारत आणि श्रीलंका यांच्यात उद्या कोलंबो येथे होणार्‍या चौथ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघ आपल्या राखीव फळीचा कस आजमावण्याची शक्यता आहे. कसोटी मालिकेपाठोपाठ पाच एकदिवसीय सामन्यांची मालिकाही  भारताने विजयाची ‘हॅट्ट्रिक’ करून खिशात घातल्याने उर्वरित दोन सामन्यांना फारसे महत्त्व उरलेले नाही.

Thursday, August 31, 2017 AT 11:23 AM (IST)

5पल्लेकले, दि. 23 (वृत्तसंस्था) : कसोटी मालिकेतील निर्भेळ यशानंतर एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना जिंकणार्‍या भारतीय क्रिकेट संघाचा ही विजयी वाटचाल पुढेही सुरू ठेवण्याचा निर्धार आहे. श्रीलंकेविरुद्ध उद्या होणार्‍या दुसर्‍या एकदिवसीय सामन्यात प्रतिस्पर्ध्यांना निर्दयीपणे नामोहरम करण्यासाठी कोहली आणि कंपनी सज्ज आहेे.

Thursday, August 24, 2017 AT 11:33 AM (IST)

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: