Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
  राज्याच्या विविध भागात नुकत्याच झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीने हातातोंडाशी आलेेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले. गेल्या वर्षीही अवकाळी पावसामुळे शेतकर्‍यांना असाच आर्थिक फटका सहन करावा लागला होता. अलीकडे नैसर्गिक संकटांचे वाढते प्रमाण लक्षात घेता नुकसानभरपाई संदर्भात पीकविम्याचा पर्याय महत्त्वाचा ठरत आहे.

Wednesday, April 18, 2018 AT 11:18 AM (IST)

अलीकडेच पुकारलेल्या ‘भारत बंद’ला हिंसक वळण लागले. त्याआधी आरक्षण, जातीय तेढ, ‘पद्मावत’सारख्या चित्रपटांमुळे आंदोलने उभी राहिली. त्यात सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान झाले. देशात सातत्याने जातीय, धार्मिक संघर्षाच्या घटना घडत आहेत. नेमक्या दंगेखोरांना अटक न होणे, जातीय, धार्मिक दंगलीतील खटले मागे घेतले जाणे आणि राजकीय नेत्यांकडून गुन्हेगारांना मिळणारं अभय यांचा या निमित्ताने विचार व्हायला हवा.

Friday, April 13, 2018 AT 11:17 AM (IST)

  चीनमध्ये आजीवन सर्वोच्च म्हणजेच अध्यक्षपद मिळवल्यानंतर जागतिक पातळीवर अस्तित्व ठसवण्यासाठी कोणत्या ना कोणत्या रूपाने चर्चेत राहण्याच्या हेतूने चीनकडून सीमावर्ती भागात छोट्या-मोठ्या कारवाया होत असतात. त्यांना प्रतिबंध करण्यासाठी भारता-कडून प्रत्युत्तर दिले जाते ज्याचा एक भाग आपण सध्या पहात आहोत. पण केवळ याचा आधार न घेता अन्य मार्गानेही शत्रूची नाकेबंदी करायला हवी. भारत-चीन या देशांदरम्यानचा तणाव पूर्णपणे निवळलेला नाही.

Wednesday, April 11, 2018 AT 11:27 AM (IST)

  तिहेरी तलाकबाबतच्या निर्णयानंतर सर्वोच्च न्यायालय मुस्लीम समाजातील बहुपत्नीत्व आणि निकाह हलाला या प्रथांची संवैधानिक वैधता तपासणार आहे. यासाठी पाच न्यायाधीशांचे विशेष घटनापीठ स्थापन केले जाईल. या घटनापीठाकडून कोणता निर्णय दिला जातो, याकडे मुस्लीम समाजाचे लक्ष लागणार आहे.

Friday, April 06, 2018 AT 11:11 AM (IST)

कर्नाटक विधानसभा निवडणु-कांचा अधिकृत कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वीच भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेसकडून मोर्चेबांधणी सुरू झाली होती. या दोन्ही पक्षांसाठी निवडणुका प्रतिष्ठेच्या असल्या तरी प्रसंगी जनता दल (सेक्युलर)ची भूमिका निर्णायक ठरू शकते.

Wednesday, April 04, 2018 AT 11:15 AM (IST)

फेसबुकच्या माहिती चोरीचे प्रकरण सध्या गाजत आहे. या प्रकरणात अगोदर काँगे्रसवर आरोप झाले. त्यानंतर काँग्रेसने भाजपवर आरोप केले. आरोप-प्रत्यारोपाचे सत्र सुरू असले, तरी प्रत्यक्षात काँग्रेसला या प्रकरणात थोडे सबुरीने घ्यावे लागेल, असे दिसत आहे. प्रचारा-साठी मदत घेण्याच्या उद्देशाने काँग्रेसने प्रचाराचे काम एका कंपनीला दिले होते. त्यावरून हा पक्ष अडचणीत आला आहे   देशात सध्या माहिती चोरीचे प्रकरण चांगलेच गाजत आहे.

Tuesday, April 03, 2018 AT 11:01 AM (IST)

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी  दिल्लीच्या रामलीला मैदानावर सुरू केलेले उपोषण आणि अधिवेशन-काळात भाजपचे माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी मंत्रालयातील उदरांचा मुक्त संचार यावरून चांगला गदारोळ उडाळा. अण्णांना आश्‍वासने देऊन उपोषण सोडवण्यात यश आले असले तरी भाजपच्याच खडसे यांनी उदरांचा उल्लेख करून विरोधकांना सभागृहात गोंधळ घालण्याची संधी दिली.

Monday, April 02, 2018 AT 11:19 AM (IST)

पंजाबी पॉप गायक दलेर मेहंदी याला पतियाळाच्या स्थानिक न्यायालयाने मानवी तस्करीसाठी दोन वर्षांची शिक्षा सुनावली. त्यामुळे साहजिकच संगीत आणि कलाक्षेत्रात खळबळ उडाली. दलेरवर 2003 मध्येच गुन्हा दाखल झाला असला तरी आता तो सिद्ध झाल्याने हे प्रकरण गंभीर बनले आहे. त्या निमित्ताने अवैध मानवी वाहतूक आणि मानवी तस्करी याविषयी जोरदार चर्चा सुरू आहे दलेर मेहंदी हा खरे तर प्रचंड लोकप्रियता लाभलेला कलाकार. त्याच्या अनेक गाण्यांना लोकांनी डोक्यावर घेतले.

Friday, March 30, 2018 AT 10:54 AM (IST)

  बिटकॉइन या आभासी चलनाची चर्चा अजूनही संपलेली नाही. या चलनाच्या वाढत्या किंमतीने, पर्यायाने वाढत्या संपत्तीने अनेकांच्या डोळ्यासमोर काजवे चमकले. या संदर्भातील अनेक व्यवहार आजही सुरू आहेत. अर्थात असे असले तरी हुरळूून जाऊन यात गुंतवणूक करणे हा फायद्याचा व्यवहार ठरु शकतो असे खात्रीशीर सांगता येत नाही.

Friday, February 23, 2018 AT 11:18 AM (IST)

पाकिस्तानकडून भारतीय लष्करी तळांवर होणारे हल्ले, वारंवार होणारे शस्त्रसंधीचे उल्लंघन आणि त्यात हकनाक मृत्युमुखी पडणारे आपले जवान तसेच निरपराध नागरिक ही अत्यंत चिंतेची बाब आहे. मुख्य म्हणजे हे हल्ले पाक लष्कराकडून होत नसून त्यांनी पोसलेल्या अतिरेक्यांकडून घडवून आणले जात आहेत.

Wednesday, February 21, 2018 AT 11:10 AM (IST)

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: