Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्यपान  >>  स्थानिक वार्ता

रहिवासी भयभीत ओढ्यांवरील अतिक्रमणांचा प्रश्‍न ऐरणीवर 5सातारा, दि. 22 : येथील  रामाचा गोट येथील भटजी महाराज मठाजवळ ओढ्याकाठी असलेल्या दीपलक्ष्मी कॉम्प्लेक्सच्या मागील बाजूचा पायाचा भराव गुरुवारी रात्री 12 च्या सुमारास अचानक खचून ओढ्यात कोसळून पार्किंगमधील तीन दुचाकी वाहने ओढ्यात पडली. भराव कोसळल्याने दीपलक्ष्मी कॉम्प्लेक्सचे मागील बाजूचे सहा पिलर उघडे पडल्याने संपूर्ण इमारत धोकादायक बनली असून तेथील रहिवासी भयभीत झाले आहेत.

Saturday, September 23, 2017 AT 11:46 AM (IST)

5सातारा, दि. 22 :  सातारा तालुक्यातील 38 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या पहिल्या दिवशी एकही अर्ज दाखल झाला  नाही. निवडणूक अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी निवडणूक निर्णय अधिकारी इच्छुकांना ऑनलाइन  अर्ज कसा भरावा लागेल याची माहिती देत होते. त्यामध्ये उमेदवाराने ऑनलाइन प्रिंटेड फॉर्मवर आवश्यक त्या ठिकाणी स्वाक्षर्‍या करणे बंधनकारक आहे.

Saturday, September 23, 2017 AT 11:42 AM (IST)

अबीर फेकणार्‍यास भाजप कार्यकर्त्यांकडून मारहाण : संशयित मारुती जानकर ताब्यात 5सातारा, दि. 22 : कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या समाधीला अभिवादन केल्यानंतर व्यासपीठाकडेे जात असताना मल्हार क्रांती संघटनेच्या मारुती जानकर याने शिक्षणमंत्री ना. विनोद तावडे यांच्यावर अबीर फेकण्याचा प्रयत्न केला. यावेळी नगरसेवक धनंजय जांभळे व पोलिसांनी त्याला अटकाव केल्यामुळे अबीर ना. तावडे यांच्या अंगावर पडला नाही.

Saturday, September 23, 2017 AT 11:40 AM (IST)

5सातारा/कराड, दि.21 ः आदिशक्ती दुर्गादेवीच्या नवरात्रोत्सवास गुरुवारपासून भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला. अश्‍विन शुद्ध प्रतिपदा ते नवमी हा देवी उपासनेचा काळ मानला जातो. यालाच नवरात्र उत्सव म्हटले जाते. नवरात्रोत्सानिमित्त सातारा, कराड, पाटण, फलटण, वाई  शहरांसह विविध तालुक्यांमध्ये ठिकठिकाणी दुर्गा मातेच्या मूर्तींची मनोभावे प्रतिष्ठापना करण्यात आली.

Friday, September 22, 2017 AT 11:32 AM (IST)

नारायण राणे जाण्याने काँग्रेस संपणार नाही : राष्ट्रवादी काँग्रेस मध्यावधी निवडणुकीला तयार 5सातारा, दि.21 : रोज रुसणार्‍या बायकोकडे नवरा फार लक्ष देत नाही. एकेदिवशी नवराच तिला जा म्हणतो, तरीही बायको  घर सोडून जात नाही. अशीच रुसणार्‍या बायकोसारखी  शिवसेनेची अवस्था झाली आहे. गेली तीन वर्षे मी त्यांची सरकारमधून बाहेर पडण्याची धमकी ऐकत आहे, अशा शब्दात राष्ट्रवादीच्या खा.

Friday, September 22, 2017 AT 11:22 AM (IST)

कर्जमाफी, भारनियमनाच्या प्रश्‍नावर राष्ट्रवादी काँग्रेस रस्त्यावर उतरून आंदोलन करणार : खा. सुळे 5सातारा, दि. 21 : सध्या मी बारामती लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहे. या मतदारसंघातील लोकांचे प्रश्‍न सोडवण्यात मला आनंद आहे. मात्र, पक्षाच्या अध्यक्षांनी सातारचे तिकीट दिले तर मी सातार्‍याचे प्रतिनिधित्व करण्यास तयार आहे, असे जाहीर करून खा. सुप्रिया सुळे यांनी खळबळ उडवून दिली.

Friday, September 22, 2017 AT 11:21 AM (IST)

5सातारा/कराड, दि. 20 : नवरात्र उत्सवास आजपासून प्रारंभ होत आहे. सातारा शहरातील सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांची तयारी पूर्ण झाली आहे. कराडमधील कृष्णा-कोयना नदीच्या काठी असणार्‍या दैत्यनिवारणी देवालयात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत. ग्रामदेवता श्री कृष्णाबाई, उत्तरालक्ष्मी या जागृत देवीच्या नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने देवालयास रंगरंगोटी करण्यात आली आहे. शहर व तालुक्यात नवरात्र मंडळांनी आकर्षक सजावटीसह विद्युत रोषणाई केली आहे.

Thursday, September 21, 2017 AT 11:30 AM (IST)

5सातारा, दि. 18 : येथील सैदापूर व तामजाईनगर अशा दोन वेगवेगळ्या भागातील बंद घरे फोडून अज्ञात चोरट्यांनी साठेआठ तोळे सोन्यासह 2 लाख रुपयांचा ऐवज लांबवला आहे. या चोर्‍यांमुळे खळबळ उडाली आहे. सुजाता रतन बोबडे (सध्या रा. तामजाईनगर, मूळ रा. सोलापूर) यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. दि. 16 रोजी त्या सोलापूरला गेल्या होत्या.

Tuesday, September 19, 2017 AT 11:32 AM (IST)

माजी केंद्रीय मंत्री वीरप्पा मोईलींचे संकेत 5हैद्राबाद, दि. 15 (वृत्तसंस्था) : काँग्रेस राहुल गांधी हे पक्षांतर्गत निवडणुकीच्या प्रक्रियेतून पक्षाचे अध्यक्ष होण्यास पसंती देतील, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री एम. वीरप्पा मोईली यांनी शुक्रवारी सांगितले. पुढील महिन्यातच राहुल गांधी काँग्रेस अध्यक्षपदाची धुरा सांभाळतील, असे संकेत त्यांनी दिले.

Saturday, September 16, 2017 AT 11:35 AM (IST)

5सातारा, दि.15  ः हातगेघर, ता. जावली येथील किराणा मालाच्या दुकानात विक्रीसाठी ठेवलेले 10 गावठी बॉम्ब व अ‍ॅल्युमिनियमच्या तारेचे 24 फास अडकवलेले जाळे बाळगल्या प्रकरणी ज्ञानेश्‍वर सर्जेराव गोळे यांच्यावर मेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Saturday, September 16, 2017 AT 11:33 AM (IST)

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: