Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
सूर्य आणि वारा यांच्यात एकदा आपल्या शक्तीविषयी वाद जुंपला. दोघेही आपण सर्वात जास्त सामर्थ्यशाली असल्याचे पटवून देत होते. शेवटी रस्त्यावरून जाणार्‍या एका वाटसरूच्या अंगावरील घोंगडी बाजूला काढून ठेवण्यास जो भाग पाडेल तोच खरा पराक्रमी समजावा असे ठरले. प्रथम वार्‍याने जोराने वाहून ती घोंगडी उडविण्याचा प्रयत्न केला पण थंडी वाजायला लागल्यामुळे वाटसरू ती अधिकच घट्ट धरू लागला. शेवटी वारा दमला. मग सूर्याने आपली प्रखर किरणे वाटसरूच्या अंगावर सोडली.

Saturday, September 23, 2017 AT 11:47 AM (IST)

महर्षी धौम्य ॠषींनी आपल्या दुसर्‍या शिष्याची उपमन्युची परीक्षा घेतली. त्यांनी त्याचा आहार बंद केला. माधुकरी मागून आणल्यानंतर गुरूने त्याला काही दिले नाही. नंतर तर माधुकरी घ्यायलाही जाऊ दिले नाही. तो गाईचे दूध प्यायला गेला तर गुरूने त्याला मानाई केली. नतंर उपमन्युने वासरांचे दूध पिऊन झाल्यावर त्याच्या तोंडाचा जो फेस गळत असे तो प्राशन करायला सुरूवात केली. पण गुरूने त्यालाही बंदी घातली.

Saturday, September 16, 2017 AT 11:35 AM (IST)

एका विहिरीजवळ एक मुलगा खेळत होता. वाटेने एक चोर जात होता. चोराला पाहिल्याबरोबर मुलगा रडायला लागला. तेव्हा चोराने त्याला विचारले, काय रे? काय झालं? तो मुलगा म्हणाला, आई मला आता मारणार. कारण माझा चांदीचा गडू या विहिरीत पडला. काही काळजी करू नकोस. मी तुझा गडू काढून देतो असे म्हणून चोराने कपडे काढले आणि तो विहिरीत उतरला. आपल्याला सहज चांदीचा गडू पचवता येईल. या विचाराने तो खूश झाला होता. विहिरीचा तळ गाठून चोराने गडू शोधण्याचा प्रयत्न केला.

Saturday, September 09, 2017 AT 11:05 AM (IST)

एका गृहस्थाच्या घरी एक दिवस एक खास मित्राला मेजवानी होती. त्याचा एक कुत्रा होता. त्यानेही आपल्या एका दोस्त कुत्र्याला त्याच दिवशी आपल्याकडे जेवणाचे आमंत्रण दिले. तो कुत्रा जेव्हा आला तेव्हा तयार होत असलेले चमचमीत जेवणाचे पदार्थ पाहतच राहिला. त्याला आनंदाच्या उकळ्या फुटू लागल्या तो म्हणाला, काय मस्त मेजवानी मिळणार आज. अगदी पोट फुटेपर्यंत मी आज खाणार आहे. मग पुन्हा परवा सकाळपर्यंत पुन्हा खायला नको.

Saturday, September 02, 2017 AT 11:42 AM (IST)

एका शेतातल्या उंदराने शहरवासी मित्राला आपल्या घरी जेवायला बोलविले. शहरी मित्राने कुतूहलाने ते आमंत्रण स्वीकारले पण जेवणाचे पदार्थ म्हणजे नुसती धान्येच होती. ते पाहून शहरी उंदीर म्हणाला, ‘मित्रा, तू अगदी साध्या किड्यामुंगीसारखा जगतोस असं दिसतं. तू आता माझ्याबरोबर शहराकडे चल. तिथं सगळे चांगले पदार्थ आहेत. आपण दोघं मिळून ते खात जाऊ.’ त्याप्रमाणे ताबडतोब ते दोघे शहरात गेले.

Friday, September 01, 2017 AT 11:37 AM (IST)

एकदा एका सिंहाने आणि गाढवाने भागीदारीत शिकार करण्याचे ठरवले. हिंडता हिंडता ते रानटी मेंढराच्या एका गुहेपाशी आले. सिंह गाढवाला म्हणाला, ‘आपण असे करूया, मी गुहेच्या बाहेर उभा राहतो. तू आत जाऊन जोरजोरात ओरडायला सुरुवात कर. सगळ्या रानटी मेंढ्या घाबरून बाहेर येतील आणि मग मी त्यांचा फडशा पाडतो’, असे म्हणून सिंह बाहेर गुहेच्या दारापाशी पाळतीवर राहिला. गाढवालाही सिंहाची युक्ती पटली आणि त्याने आत घुसून मोठ्याने खिंकाळण्यास सुरुवात केली.

Thursday, August 31, 2017 AT 11:22 AM (IST)

ही गोष्ट साधारण 1937-38 सालातली आहे. सोळा-सतरा वर्षाचे युवा नौशाद लखनौहून काहीतरी कामगिरी करण्यास बाहेर पडले होते. मुंबईत एक विद्वान प्राध्यापक नामीसाहेब कुलाब्यात राहात. त्यांच्या घरी ओळखीनं नौशाद राहात व दिवसभर कामाच्या शोधात स्टुडिओतून फिरत असत. मुंबईच्या भुलभुलैयात गरीब स्वभावाच्या नौशादचे पाकीट हरवले. जवळच पुंजी संपली. पण त्यांनी प्रयत्न मात्र सोडले नाहीत.

Wednesday, August 30, 2017 AT 11:32 AM (IST)

कृष्ण जेवत होते. दोन घास खाल्ले आणि ताट बाजूला सारून ते दरवाजाकडे गेले. रुक्मिणी म्हणाली, ‘असं भरल्या ताटावरून कुणी उठतं का?’ काहीही उत्तर न देता कृष्ण दरवाजापर्यंत गेले आणि परत येऊन जेवू लागले. रुक्मिणीने विचारताच ते म्हणाले, ‘माझा आवडता भक्त रस्त्यातून जात होता. काही लोक त्याला दगड मारीत होते. रक्ताळलेल्या अवस्थेतही तो हसत होता. त्याला माझी गरज होती, म्हणून उठलो होतो.

Monday, August 28, 2017 AT 11:35 AM (IST)

अब्राहम लिंकन यांच्या जीवनातील कथा. एकदा ते सिनेटच्या बैठकीला निघाले होते. वाटेत त्यांनी पाहिले की, रस्त्याकडेच्या एका खड्ड्यातील चिखलात एक डुक्कर अडकले होते. त्यातून बाहेर पडण्यासाठी ते केविलवाणी धडपड करत होते. पण होत होते मात्र उलटेच. अखेर लिंकन तेथे गेले. त्यांनी त्या डुकराला चिखलातून बाहेर काढले. या प्रयत्नात त्यांच्या कपड्यांना खूपच चिखल लागला पण ते बदलण्यास वेळ लाग़ेल म्हणून अखेर ते तसेच बैठकीला गेले.

Wednesday, August 23, 2017 AT 11:24 AM (IST)

रामकृष्ण परमहंस यांची ही गोष्ट. रामकृष्ण परमहंस हे एके सकाळी नदीत स्नानाला गेले होते. स्नान करून सूर्याला अर्ध्य देण्यासाठी त्यांनी ओंजळत पाणी घेतले तेवढ्यातच त्या नदीत बुडत असणारा एक विंचू त्या पाण्यातून त्यांच्या ओंजळीत आलेला त्यांना दिसला. ओंजळीतील पाणी ओघळून गेल्याबरोबर त्या विंचवाने रामकृष्णांच्या हातांना दंश केला. लगेचच त्यांनी वेदनेने हात झटकला आणि विंचू नदीत पडून बुडायला लागला.

Monday, August 14, 2017 AT 11:23 AM (IST)

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: