Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्यपान  >>  विभागीय वार्ता

धरणाचे सहा दरवाजे अर्धा फूट उचलले 5पाटण, दि. 16 : कोयना धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या सप्ताहापासून परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. त्यातच वेधशाळेने पुढील दोन दिवसात पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तविल्याने ‘ओव्हरफ्लो’ झालेल्या धरणाचे सहा दरवाजे रविवारी रात्री अर्धा फूट वर उचलून नदीत 6,710 क्युसेक्स पाणी सोडण्यात येत आहे. धरण पाणलोट क्षेत्रात परतीच्या पावसाचा जोर सात दिवसांपासून आहे. धरणात सध्या 104.60 टीएमसी पाणीसाठा आहे.

Tuesday, October 17, 2017 AT 11:51 AM (IST)

5वडूज, दि. 16 : वडूज परिसरात सलग दोन दिवस झालेल्या परतीच्या पावसाने लाखो रुपयांची वित्तहानी झाली आहे. येरळा नदी पात्राचे पाणी दुकानात घुसल्याने येथील रत्नाई अ‍ॅग्रो क्लिनिक व राहुल हार्डवेअर या दोन दुकानदारांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पुराच्या पाण्यामुळे नायकाचीवाडी येथील पूल खचल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. सलग दोन दिवस वरुड, नागाचे कुमठे, नायकाचीवाडी परिसरात मुसळधार पाऊस झाला.

Tuesday, October 17, 2017 AT 11:49 AM (IST)

5कराड, दि. 16 : पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर सोमवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास एका वाहनाच्या धडकेत वेडसर इसम जागीच ठार झाला. त्याच वेळी पाठीमागून आलेल्या कारचालकाचा समोर पडलेला इसम पाहून कारवरील ताबा सुटल्याने कार दुभाजकाला धडकली. या अपघतात सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर सोमवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास एका इसमाला वाहनाने धडक दिली.

Tuesday, October 17, 2017 AT 11:48 AM (IST)

5बिजवडी, दि. 16 : जुलै महिन्यात बेपत्ता झालेला येथील युवक कुंडलिक रामचंद्र भोसले याचा ससून हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना मृत्यू झाला. कुंडलिक भोसलेचा बेपत्ता झालेल्या दिवशी खुंटे, ता. फलटण येथे अपघात झाला होता. गंभीर अवस्थेत पोलिसांनी त्याला शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. अधिक उपचारार्थ त्याला ससून हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले होते. तेथे उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला.

Tuesday, October 17, 2017 AT 11:37 AM (IST)

5पाचगणी, दि. 13 : महाबळेश्‍वर तालुका संघर्ष समितीचे भक्कम पाठबळ आणि पाचगणीच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक तृप्ती सोनावणे यांच्या क्लीन द डर्ट मोहिमेला प्रतिसाद देत पाचगणीत खंडणी मागितल्याचा दुसरा गुन्हा दाखल झाला. हॉटेल राहिल प्लाझा प्रकरणातील पटाईत दाम्पत्याने आपल्या हस्तकाकरवी उद्योजक सलिम मोगल यांना 10 लाख खंडणी आणि जीवे मारण्याची धमकी दिली होती. या प्रकरणी त्याच्यासह आणखी पाच जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.

Saturday, October 14, 2017 AT 11:34 AM (IST)

5कराड, दि. 13 : कराड अर्बन बँकेच्या कामकाजावर ग्राहकांचा अढळ विश्‍वास असल्यानेच बँकेची सर्वांगीण प्रगती साध्य झाली आहे, ग्राहकांच्या या प्रेमामुळेच बँकेने दिवाळीच्या सणानिमित्त वाहन व गृहकर्जावरील व्याजदर कमी केले असून ग्राहकांना आता 9.50% व्याजदराने गृहकर्ज व वाहन कर्ज उपलब्ध होणार असून ग्राहकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन बँकेचे चेअरमन डॉ. सुभाष एरम यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केले. चेअरमन डॉ.

Saturday, October 14, 2017 AT 11:30 AM (IST)

राष्ट्रवादीच्या एल्गार मोर्चात श्रीमंत संजीवराजेंचे आवाहन 5फलटण, दि.

Friday, October 13, 2017 AT 11:33 AM (IST)

5वाई, दि. 12 ः नोटाबंदीच्या काळात बँक ऑफ महाराष्ट्रच्या वाई शाखेतून यूपीआय मोबाईल अ‍ॅप्लिकेशनचा वापर करून, बँक खात्यात पैसे शिल्लक नसताना ई-ट्रान्झॅक्शन करून बँकेची आठ लाख रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी चौघांविरुद्ध शाखा व्यवस्थापक सुनील वानखेडे यांनी आज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. याबाबत पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी, दि. 13 जानेवारी ते 18 जानेवारी 2017 या कालावधीत पूजा रवींद्र गायकवाड व रवींद्र नारायण गायकवाड (रा.

Friday, October 13, 2017 AT 11:31 AM (IST)

5पाचगणी, दि. 12 : हॉटेलचे बांधकाम अवैध आहे आणि तुमचा हॉटेल व्यवसाय बेकायदेशीर असल्याचे सांगून पाचगणीतील फजल पटाईत व त्याची पत्नी शेख फराह फजल पटाईत यांच्या विरोधात पाचगणी पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे. पाचगणी व महाबळेश्‍वर परिसरात माहितीच्या अधिकाराचा गैरवापर आणि दमदाटी करून पैसे उकळण्या विरोधात संघर्ष समितीने नुकताच मोर्चा काढला होता. त्यातूनच पटाईत दाम्पत्याचे उदाहरण समोर आल्याचे बोलले जात आहे.

Friday, October 13, 2017 AT 11:30 AM (IST)

5रहिमतपूर, दि. 12 : धामणेर, ता. कोरेगाव येथील किशोर नारायण क्षीरसागर या तरुणास लष्करात भरती करतो, असे सांगून एक लाख रुपये घेऊन फसवणूक केल्याची फिर्याद या तरुणाने रहिमतपूर पोलीस ठाण्यात नोंदवली आहे. याबाबत माहिती अशी, किशोर क्षीरसागर हा आपल्या कुटुंबा-समवेत धामणेर येथे राहतो. पदवीधर झाल्यानंतर तो लष्कर भरतीसाठी प्रयत्न करत असताना त्याची ओळख सूरज अरुण शेडगे व सोमनाथसदाशिव भोसले (दोघे रा. शिरंबे, ता. कोरेगाव) यांच्याशी झाली. तुला लष्करात भरती करतो.

Friday, October 13, 2017 AT 11:27 AM (IST)

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: