Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुंबई शहरातल्या श्रमिकांसाठी सलग 70 वर्षे आंदोलनाद्वारे सरकारशी झुंजणार्‍या ज्येष्ठ समाजवादी नेत्या कमल देसाई यांच्या निधनाने, महाराष्ट्रातल्या सामाजिक आंदोलनाचा साक्षीदार काळाच्या पडद्याआड गेला आहे. माहेरी आणि सासरीही स्वातंत्र्य चळवळीतल्या सहभागाचा वारसा मिळालेल्या कमलताईंच्या पतीचे विवाहानंतर अल्पावधीतच निधन झाले. आपले मेहुणे बाबूराव सामंत यांच्या सल्ल्याने त्या समाजवादी पक्षाच्या विविध आंदोलने आणि चळवळीत सक्रियपणे सहभागी झाल्या.

Friday, February 23, 2018 AT 11:18 AM (IST)

अरुणाचल प्रदेशातल्या तेजू शहरात संतप्त जमावाने पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून तिचा खून करणार्‍या दोन संशयित आरोपींना बेदम मारहाण करून, जिवंतपणीच त्यांना जाळून ठार केल्याची थरारक घटना सोमवारी घडली. विशेष म्हणजे हे दोन्ही आरोपी पोलीस कोठडीत असताना, एक हजार लोकांच्या संतप्त जमावाने या कोठडीवरच भर दुपारी बारा वाजता जोरदार हल्ला चढवला. पोलिसांच्या उपस्थितीतच कोठडीचे कुलूप तोडून, या दोन्ही संशयितांना खेचून बाहेर काढले.

Wednesday, February 21, 2018 AT 11:11 AM (IST)

प्रशासनातले अधिकारी कागदी घोडे नाचवण्यात दंग झाल्यावर, चांगल्या मोहिमांचाही बोजवारा कसा उडतो, याची अनेक उदाहरणे आहेत. आदिवासींच्यासाठी डझनभर कल्याणकारी योजना सरकारने जाहीर केल्या असल्या, तरी त्यांची अंमलबजावणीच नीट होत नसल्याने, दरवर्षी आदिवासींच्या हजारो बालकांचे अपमृत्यू होतात. हजारो कळ्या खुडल्या जातात. गर्भवती आदिवासी महिलांसाठी पोषक आहाराची योजना कागदावरच राहते आणि या महिला मात्र कुपोषितच राहतात.

Tuesday, February 20, 2018 AT 11:12 AM (IST)

दंगलखोर आणि हिंसक जमावाला पांगवायसाठी लष्करी दलाने जम्मू काश्मीर राज्यातल्या  शोपियान गावात 27 जानेवारी रोजी केलेल्या गोळीबारात तीन नागरिक ठार झाल्या प्रकरणी राज्य सरकारने या तुकडीचे प्रमुख मेजर आदित्य कुमार यांच्या विरोधात दाखल केलेल्या खुनाच्या गुन्ह्याच्या तपासाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. दहाव्या गढवाल बटालियनचे प्रमुख असलेल्या आदित्य कुमार यांच्या तुकडीने हिंसक जमावाने जवानांनाच लक्ष्य केल्याने, गोळीबार केला होता.

Thursday, February 15, 2018 AT 11:21 AM (IST)

  देशाच्या सर्व भागात पतंग उडवायचा खेळ परंपरेने सुरू असला, तरी पूर्वी पतंग उडवायसाठी दोरा वापरला जात असे. पतंगांच्या काटा-कटीच्या खेळात आपला पतंग काटला जावू नये आणि दुसर्‍याच्या पतंगाचा दोरा काटला जावा, यासाठी काचेच्या चुर्‍याचा वापर करून मांज्याचा दोरा वापरला जात असे. गेल्या काही वर्षात मांज्याच्या या परंपरागत दोर्‍याच्या ऐवजी चिनी आणि नॉयलॉनच्या मांज्याचा सर्रास वापर सुरू झाला.

Tuesday, February 13, 2018 AT 11:10 AM (IST)

सध्या भारत-पाक सीमेवर होत असलेल्या चकमकी, त्यामुळे वाढत्या शहिदांची संख्या आणि दहशतवादी हल्ल्यांची चिंता जरी देशाला भेडसावत असली तरीही देशापुढचे फार मोठे आव्हान आहे ते डिजिटल दहशतवादाचे. फार मोठे आव्हान आहे ते सायबर क्राईमचे. जेवढी भयानकता एका अणुबॉम्बमध्ये आहे त्यापेक्षा कितीतरी पटीने दाहकता ही डिजिटल शस्त्रांची आहे. सोशल मीडियाचा वापर करून सोडलेली ही डिजिटल अस्त्रे नियंत्रित करणे हे आपल्या देशापुढचे फार मोठे आव्हान आहे.

Monday, February 12, 2018 AT 11:12 AM (IST)

उत्तरप्रदेशातल्या बरेली जिल्ह्यातल्या छोट्या खेड्यात जन्मलेल्या अरविंदकुमार गुप्ता यांनी, गावातल्याच प्राथमिक शाळेत शिक्षण घेतले. पुढे कानपूरच्या आय. आय. टी. मधून बी. ई. झाल्यावर,  शालेय विद्यार्थ्यांना विज्ञान आणि गणित सोपे करून कसे शिकवता येईल, या ध्यासाने त्यांना पछाडले. देशातल्या बहुतांश प्राथमिक आणि माध्यमिक शाळातल्या विद्यार्थ्यांना गणित आणि विज्ञान हे विषय खूप अवघड वाटतात, याचा अनुभव त्यांनी प्राथमिक शाळेत शिकतानाच घेतला होता.

Saturday, February 10, 2018 AT 11:26 AM (IST)

महाराष्ट्राची राजभाषा ‘मराठी’ असली, तरी इंग्रजी भाषेच्या अक्राळ-विक्राळ आक्रमणाने आणि चंगळवादी संस्कृतीच्या प्रभावाने माय मराठीला खग्रास ग्रहण लागले आहे. मराठी भाषा आणि संस्कृतीचे आम्ही वारसदार आहोत अशा अभिनिवेशाने, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालाच पाहिजे, यासाठी आंदोलने करणार्‍यांनाही महाराष्ट्रातल्या मराठी माध्यमाच्या प्राथमिक शाळा बंद पडत आहेत, ही बाब गंभीर असल्याचे वाटत नाही.

Friday, February 09, 2018 AT 11:05 AM (IST)

गुजरात विधानसभेच्या निवडणुकीत सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचा पराभव करायसाठी काँग्रेस पक्षाने धूर्तपणे पाटीदारांच्या संघटनेशी निवडणूक युती केली असली, तरी काँग्रेसने उमेदवारांची पहिली यादी जाहीर करताच या संघटनेत फूट पडली आहे. गेल्या आठवडाभर पाटीदार आरक्षण आंदोलन समितीचे नेते हार्दिक पटेल आणि काँग्रेसच्या नेत्यांशी मतदार संघाच्या वाटपावरून चर्चा सुरू होती.

Wednesday, November 22, 2017 AT 11:33 AM (IST)

ठुमरी, दादरा, कजरी, चैती अशा शास्त्रीय रागांवर हुकमत असलेल्या आणि हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातल्या सोनिया बनारस घराण्याचा वारसा निष्ठेने पुढे नेणार्‍या गिरिजादेवी यांच्या निधनाने या घराण्याची अंतिम दीपशिखा अनंतात विलीन झाली आहे. ‘ठुमरीची राणी’ असा लौकिक असलेल्या गिरिजा देवींनी उपशास्त्रीय संगीतातही प्रभुत्व मिळवले होते. पूरबअंग गायिका असलेल्या गिरिजा देवींनी चौमुखी गायनाचा आदर्श निर्माण केला होता.

Friday, October 27, 2017 AT 11:35 AM (IST)

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: